जिल्ह्याच्या ग्रामीण भागात स्वच्छतेचा जागर

स्वच्छता ही सेवा अभियानाला लोक सहभागाची साथ

ठाणे दि २९ : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात स्वच्छता ही सेवा या अभियानाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून विविध माध्यमातून स्वच्छतेचा जागर होत आहे. जिल्हा परिषदेचा स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी -कर्मचारी हे अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजनपूर्वक काम करत असल्याचे छायादेवी शिसोदे यांनी सागितले.

या अभियानाचा शुभारंभ 15 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 2 आॕक्टोबर पर्यत हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियान कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत येणारे गाव, पाडे- वस्त्यांमध्ये सामुहिक श्रमदान केले जात आहे. शाळांमध्ये विद्यार्थांच्या निबंध, वक्तृत्व, चित्रकला आदि स्पर्धा घेवून शालेय स्तरावर स्वच्छतेबाबत जाणीव जागृती केली जात आहे.

तालुकास्तरावर ग्रामसेवक, विविध विभागांचे कर्मचारी यांच्या कार्यशाळा घेवून या कार्यशाळेतून शाश्वत स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, संतगाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रभाग निवड, नादुरुस्त शौचालय दुरुस्त करुन वापरात आणणे , शौचालयाचा वापर होत नसेल अशा ठिकाणी माहीती देऊन शौचालयाचा वापर करण्यास प्रवृत्त करणे आदी उपक्रमाची माहिती दिली जात आहे.

अधिकारी वर्ग या उपक्रमात सहभागी झालेले असताना स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी देखिल आपआपल्या गण- गटांमध्ये स्वच्छतेसाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. त्यामुळे गावातील ग्रामस्थ गल्ली, रस्ते सार्वजनिक ठिकाण स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेऊन गाव स्वच्छ करत आहेत. या अभियानात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, बचतगट महिला, ग्रामस्थ सहभाग घेत आहेत.

या अभियानासाठी लेखाधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अनिल निचिते, समाजशास्त्रज्ञ दत्तात्रय सोळुंके, मनुष्य बळ विकास सल्लागार ज्ञानेश्वर चंदे, सहनियंत्रण व मूल्यमापन तज्ञ अतुल केणे, वित्तनि संपादणूक सल्लागार पल्लवी तडाके, जल निरीक्षक राजेंद्र देवरे, पाणी गुणवत्ता सल्लागार हिरालाल निरभवणे, माहिती शिक्षण व संवाद सल्लागार प्रमिला सोनवणे, शालेय स्वच्छता व आरोग्य सल्लागार सारिका देशमुख, अभियांत्रिकी तज्ञ अमोल धनवडे, विद्या कांबळे, एकनाथ पडळकर आदि अधिकारी -कर्मचारी काम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *