ठाण्यात ४, ५ डिसेंबर रोजी ग्रंथोत्सव

ठाण्यात ४, ५ डिसेंबर रोजी  ग्रंथोत्सव

युवा वाचक,लेखकांना आकर्षित करणार

 ठाणे दि ३: साहित्य आणि संस्कृतीचे ठाणे अशी ओळख असलेल्या ठाणे शहरात ठाणे ग्रंथोत्सव ४ आणि ५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येत आहे असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी कळविले आहे. हा ग्रंथोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने व्हावा तसेच युवा पिढीला याकडे आकर्षित करण्यासाठी या पिढीशी नाळ असणारे लेखक व साहित्यिक बोलवावे अशी सुचना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी नुकतीच यासंदर्भातील एका बैठकीत केली.

ठाणे शहरातील वाचनालय आणि ग्रंथालयांचा साहित्य प्रसार व प्रसिद्धीत खूप मोठा सहभाग राहिला आहे. या साहित्य संस्कृती जपणाऱ्या शहरातच यंदा हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यंदा विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सदर करण्यात येतील तसेच प्रकाशक, ग्रंथ विक्रेते यांनाही एकाच ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, जिल्हा माहिती अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे तसेच ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे कर्मचारीही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *