मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाचा शुभारंभ

ठाणे महानगरपालिकेच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाचा शुभारंभ मंगळवारी (17 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पारसिक रेतीबंदर विसर्जन घाट येथे करण्यात आला. यावेळी पारसिक घाटावर उपस्थित असलेल्या नागरिकांना आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची असून प्रत्येकांनी स्वच्छतेबाबत जागरुक राहण्याचे आवाहन करीत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिकत आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुकत मनिष जोशी, शंकर पाटोळे, आरोग्य अधिकारी डॉ.राणी शिंदे, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

मी स्वत: स्वच्छतेच्या बाबतीत जागरुक राहीन, मी स्वत: कुठेही कचरा फेकणार नाही व दुसऱ्यालाही फेकू देणार नाही, त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशनमधील माझा सहभाग म्हणून माझ्या घरात, माझ्या दुकानात, कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करुन ओला कचरा हा हिरव्या कचरा पेटीत व सुका कचरा हा निळ्या कचरा पेटीत टाकीन आणि घरगुती घातक कचरा लाल कचरा कुंडीतच टाकेन तसेच प्लास्टिक व थर्माकोलच्या वापराला प्रतिबंध करुन माझे ठाणे शहर, पर्यायाने माझे राष्ट्र, माझा देश प्लास्टीक व थर्माकोल मुक्त होण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन अशी शपथ देवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाचा शुभारंभ केला.

या अभियानाच्या काळात शहरात जनजागृतीपासून प्रत्यक्ष सफाईपर्यत उपक्रम संपूर्ण शहरात आयोजित केले जाणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक पेड माँ के नाम यासाठी नागरिकांना रोपे आणि कंपोस्ट खताचे वाटप करण्यात आले.

स्वच्छता ही सेवा हे अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत देशभरात मोठ्या उत्साहात साजरे जाणार आहे. या अभियानातंर्गत ‘एक पेड मा के नाम’, ‘स्वच्छता कर्मचारी, लाडकी बहीण योजना आणि हरित ठाणेचे प्रतिनिधित्व करणारे सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहेत. तसेच या अभियानातंर्गत शहरात अनेक ठिकाणी क्लीन ड्राईव्ह घेण्यात येणार आहेत. तसेच स्वच्छता अभियान केवळ 2 ऑक्टोबरपर्यंत मर्यादित राहणार नाही तर त्यानंतरही ते सुरू राहणार असून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *