बोकड मंडईतुन हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश

मिरारोड बकर कसाई जमात तर्फे बकरी ईद निमित्त बोकड मंडईला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद
# बोकड मंडईतुन हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश  – शाहरुख मुलाणी

भाईंदर. (प्रतिनिधी)   ‘बकरी ईद’ निमित्त सकाळीच नमाज अदा करून मुस्लिम बांधव एकमेकांना ‘ईद मुबारक’ म्हणत आलिंगन देत शुभेच्छा देतात. मिरारोड बकर कसाई जमात तर्फे बकरी ईद नागरिकांची सोय व्हावी यानिमित्त ‘बोकड मंडई’ आयोजित करण्यात आली आहे. या मंडईला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत आहेत. यात हिंदू मुस्लिम व्यापाऱ्यांसह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने आपल्या व्यवसाय करत असून यातून सर्वधर्म समभाव चा संदेश मिळत आहे असे प्रतिपादन सदस्य शाहरुख मुलाणी यांनी केले आहे.

‘रमजान’च्या पवित्र महिन्याच्या समाप्तीनंतर जवळपास 70 दिवसानंतर हा सण साजरा केला जातो. इस्लामिक मान्यतेनुसार हजरत इब्राहिम आपला मुलगा हजरत इस्माईल याला याच दिवशी ईश्वराच्या आदेशानुसार ‘कुर्बान’ करण्यासाठी घेऊन निघालेला होते. तेव्हा अल्लाहने त्यांच्या मुलाला जीवनदान दिले. या दिवसाची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो. ‘ईद उल अजहा’ किंवा ‘ईदे- अजहा’ हा सण प्रामुख्याने ‘बकरी ईद’ म्हणून ओळखला जातो. रंगीबेरंगी नवीन कपडे, सुगंधी दरवळ, खमंग पदार्थ आणि शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या गर्दीने प्रत्येक मुस्लिम बांधवाच्या घरातील वातावरण भारून गेले. ईदच्या सुटीनिमित्त फिरायला जाणे, नातेवाईकांना भेटण्याला बहुतेक कुटुंबांनी पसंती दिली. हा सण मुस्लिम धर्मियांचा अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. मुस्लिम धर्मियांमध्ये एकूण तीन प्रकारे ईद साजरी केली जाते. त्यातील इतर दोन प्रकार म्हणजे ईदुलफित्र किंवा रमजान ईद आणि मिलादुन्नबी ईद. हे तिन्ही सण बंधुभाव, त्याग, समर्पण आणि मानवतेचा संदेश देतात. सर्वसामान्यपणे या सणाचा संबंध बकऱ्याशी लावला जातो, पण प्रत्यक्षात तसे नाही. ‘बकर’ या शब्दाचा अर्थ ‘मोठा प्राणी’ ज्याचा ‘जिबह’ म्हणजेच बळी दिला जातो, असा आहे. यातून ‘बलिदान’ अर्थात ‘त्यागा’ ची भावना अधोरेखीत केली जाते. अरबी भाषेत ‘कर्ब’ या शब्दाचा अर्थ अत्यंत जवळ असा होतो. म्हणजेच यावेळी ईश्वर व्यक्तीच्या सर्वात जवळ असतो. परंतु भारत, सह काही देशात या शब्दाचा अपभ्रंश झाल्याने या सणाला ‘बकरा ईद’ असे म्हटले जाते. या दिवशी कुर्बानीचा एक हिस्सा कुटुंबीयांसाठी, दुसरा हिस्सा नातेवाईकांसाठी आणि तिसरा हिस्सा गोरगरिबांसाठी देण्याची प्रथा आहे. असे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्ग.चे मंत्रालयीन सचिव तथा मिरारोड बकर कसाई जमातचे सह सचिव शाहरुख मुलाणी यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांना लांब जाऊन बोकड खरेदी करण्यापेक्षा शहरात बोकड उपलब्ध व्हावे या अनुषंगाने ही बोकड मंडई भरविण्यात असल्याचे अध्यक्ष मुस्ताक कुरेशी उर्फ नाना यांनी सांगितले. यावेळी या मंडईत मध्ये विविध राज्यातून व्यापारी आले आहे यात हे शेतकरी असतात. सह कुटुंब शेतकरी वर्षभर शेळीपालन करत असतात. हे व्यापारी गुजरात, राजस्थान मधून आलेले आहेत. शेळीपालन करणारे हे शेतकरी वर्षभरात आवश्यक तेव्हाच बोकड विकतात. पण अधिकतर बोकड हे केवळ बकरी ईद साठी राखून ठेवतात. जेणेकरून अधिक नफा व्हावा. चार पैसे जास्त देऊन बोकूड खरेदी करण्याची मुस्लिम भाविकांची तयारी असते. धार्मिक भावना तीव्र असल्यामुळे असे भाविक लोक पैसे देण्यासाठी बिलकूल मागे-पुढे पहात नाहीत. ती शेतकऱ्यांसाठी पर्वणीच बाजू असते. यातूनच बकरी ईद ला मुंबईत येऊन हे बोकड विकतात. आलेल्या पैशातून कुटुंबातील मुलींची लग्ने, मुलांचे शिक्षण आदी संसार करत असतात. अशी माहिती मुलाणी यांनी दिली. तसेच संघटनेस झालेल्या नफ्यातून इतर कुटुंबाप्रमाणे गोरगरीब, अनाथ, विधवा महिनांना ईद साजरी करता यावी म्हणून त्यांना मदत कार्य केले जाते. असे कुरेशी यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य खाटिक समाज संस्था सलग्न मिरारोड बकर कसाई जमात चे अध्यक्ष मुस्ताक कुरेशी उर्फ नाना, सचिव अश्पाक पटेल, सह सचिव सफी कदर, उपाध्यक्ष आरिफ कोथमिरे, उपाध्यक्ष अल्ताफ गनी, सह सचिव अल्ताफ खाटीक ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्ग. चे शाहरुख मुलाणी, सुफीयान शेख मेहनत घेत असत. यात स्थानिक महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य लाभते असे कुरेशी यांनी सांगितले.

??
??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *