येऊरच्या जंगलातील सोनम तांदळाची चव न्यारी

पावसाने दमदार बटिंग केल्यामुळे निसर्ग चांगलाच बहरला आहे. त्यामुळे या दिवसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक जंगलात अथवा निसर्गरम्य ठिकाणी जाताना दिसतात, मुबई ठाणे परिसरातल्या पर्यटकांसाठी हक्काच असलेलं येऊरही तितकंच हिरवंगार झालेलं आहे. त्यामुळे येथील रानवाटा शोधत असताना कुठे तरी एखादा आदिवासी शेतीची लागवड करताना दिसतो. विशेष म्हणजे देशात राज्यात ओला सुका दुष्काळात शेतकऱ्यांचे आत्महत्येच सत्र असतांना येथील शेतकरी मात्र मोठ्या कुशलतेने आपला पारंपरिक व्यवसाय करतो आहे. सेंद्रिय खताचा वापर करून सोनम जातीचा बारीक तांदूळ पिकवत असून हा त्याची चव देखील तितकीच भन्नाट असल्याचे सांगितले जाते.

मुबई ठाण्याचे हृदय म्हणून संजय गांधी राष्टीय उद्यान म्हणून ओळखल जात. या मधील उद्यानाचा भाग असलेलं येऊर पर्यटकांना नेहमीच खुणावत असत. वर्षाचे बाराही महिने या परिसरात पर्यटकांची वर्दळ असली तरी पावसाळ्यात येऊरची नजाकत काही औरच आहे. जंगलाच्या पायवाटेने दरमजल करत जात असताना वाटेतच जमिनीच्या छोट्या छोट्या तुकड्यावर भात शेती लावलेली दिसते. एवढ्या गर्द रानात अशी भातशेती बघून नव्या पर्यटकांना नेहमीच उत्सुकता लागून रहाते. परंतु एवढ्या गर्द रानात इथला आदिवासी शेती मधून रोजीरोटी मिळवण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रातील शेतकरी रासायनिक खतांचा वापर करून शेती करतो आहे. जास्त प्रमाणात पीक काढतो आहे. असे असतानाही कर्जबाजारी झालेला हा शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारीत आहेत. परंतु या उलट ठाण्यातील येऊरगावातील आदिवासी शेतकरी मात्र सेंद्रिय खताचा वापरून उच्च प्रतीचा सोनम तांदूळ आणि भाजीपाला पिकवून त्या जोरावर आत्महत्येपासून दूर राहण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या शेतीपर्यंत कसल्याही प्रकारचे शेती तंत्रचे ज्ञान पोहचलेले नसतानाही अवघ्या एक ते दोन गुंठ्यांमध्ये तो २००  किलो तांदूळ पिकवून सुखाचे जिणे जगताना दिसतो.

प्रशांत सिनकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *