ठाणे शहर जिल्हा युवक काँगेस आगामी काळात होणार आक्रमक,सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर

ठाणे दि ;ठाणे शहर जिल्हा युवक काँगेस आगामी काळात आक्रमक होणार असून सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार आहे.  ठाणे शहर (जिल्हा) युवक कॉंग्रेसची मासिक बैठक ठाणे येथे वुडलैंड हॉटेल मधिल सभागृहात  संपन्न झाली याबैठकीत सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आंदोलने करण्यात येणार आहेत. हि बैठकीला महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसचे सचिव ठाणे शहर युवक कॉग्रेसचे प्रभारी पंकज जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पड़ली.
बैठकीच्या सुरुवातीला अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या ठाणे शहर (जिल्हा) युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विनर बिंद्रा यांच्या सह सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आगामी काळात युवक कॉग्रेस ने अक्रमक़पणे काम करत भाजपा सरकार विरुद्ध धरणे, आंदोलन, रास्ता रोको, विविध विषयावर चुकिच्या धोरणाविरोधात सक्रिय राहावे लागणार असल्याचे मत प्रभारी मा.श्री पंकज जगताप यांनी व्यक्त केले
 विनर बिंद्रा यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिलाच बैठकीत बिंद्रा यांनी आक्रमक भूमिका घेत  ८ नोव्हेंबरला नोटबंदी मधे मृत्यु पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण,१४ नोव्हेंबरला बालदिन,१७ नोव्हेंबर ला भाजपा सरकारच्या ४ वर्ष पूर्तीवर निषेध,१९ नोव्हेंबरला इंदिरागांधी जयंती असे विविध कार्यक्रम राबवणार असल्याचे ठाणे शहर (जिल्हा) युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विनर बिंद्रा जाहीर केले
सदर मासिक बैठकित माज़ी लोकसभा अध्यक्ष निशांत भगत,प्रदेश सचिव आशीष गिरी, उपाध्यक्ष राहील हनफ़ी,किशोर कांबले, सोनललक्ष्मी घाग,सरचिटणीस सचिन जैन,तुषार गायकवाड,मयंक गुप्ता,अंजनी गिरी , रोशन पाटिल चिटणीस श्रुतिका मनोज शिंदे , लोकेश घोलप , पार्थ भोईर , अमित डाकि , संदीप तायडे , निलेश दास ,रोहन पाटिल कोपरी पंचपखडी विधानसभा अध्यक्ष दिपक पाठक , ओवला मजीवाड़ा विधानसभा अध्यक्ष महेश म्हात्रे ,मीरा भाईंदर विधानसभा अध्यक्ष रियाज़ शेख उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *