-मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन 2020 नुसार, प्राथिमक स्तरावर सन 2026-27 पर्यंत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नाही, सर्व विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यात कायमर्यादित अभियान राबवणे आवश्यक आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत शाळांमध्ये DIET व VOPA यांच्या मदतीने FLN अंतर्गत प्रोजेक्ट दिशा उपक्रम विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी हाती घेतलेला आहे. प्रोजेक्ट दिशाची शाळा स्तरावरील अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज, (दि. 16 सप्टेंबर 2024) प्रत्यक्ष कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पिंपरी, खोणी, नागाव या शाळांना भेट दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात जुलै २०२४ व ऑगस्ट २०२४ या महिन्यामध्ये जिल्हास्तरीय शिक्षण परिषद देखील घेण्यात आलेल्या असून त्यामध्ये उपक्रम यशस्वीपणे राबवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.
या शाळा भेटीमध्ये जुलै व ऑगस्ट अखेर निश्चित करण्यात आलेल्या अध्ययन स्तराचे तुलनात्मक दृष्ट्या विश्लेषण करून आजची वस्तुस्थिती लक्षात घेऊन शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांचा वैयक्तिक शैक्षणिक कृती आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. वैयक्तिक, शैक्षणिक कृती आराखडा तयार करताना अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन (Management of Learning Intervention -MOLI) प्रशिक्षण/ वेध उपक्रम सहसंबंध समजावून सांगताना विषय मित्र, गट अध्ययन, सेल्फी विथ सक्सेस, आव्हान देणे, स्वयं अध्ययनास प्रेरणा, जिज्ञासू वृत्तींचा सन्मान, शिकण्याच्या गतीत वाढ व तंत्रज्ञानाचा वापर करणे याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे शाळा भेटीमध्ये शाळा यापूर्वी शाळेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या भाषा, गणित इत्यादी शैक्षणिक साहित्याचा वापर सकारात्मक आणि जास्तीत जास्त पद्धतीने कसा करता येईल याविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. वैयक्तिक शिक्षण कृती आराखडा करताना विद्यार्थी एका स्तरातून दुसऱ्या स्तराकडे कसा संक्रमित होईल यासाठी आराखड्यामध्ये कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात या विषयी शिक्षकांची संवाद साधला.
या उपक्रमाची अंमलबजावणी करताना तसेच आराखडा तयार करताना शिक्षकांच्या येणाऱ्या अडचणी देखील समजून घेतल्या आणि शिक्षकांच्या अडचणीवर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कृतींचा शनिवार या मालिकेत शिक्षकांनी सहभागी होण्यासाठी सुचना दिल्या.
यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले, कार्यकारी अभियंता कदम आणि केंद्रप्रमुख खोणी हे देखील उपस्थित होते.